satara | यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्या

सातारा (प्रतिनिधी)- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. कॉंग्रेसने यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा केवळ वापर केला. त्यांचे विचार अंगिकारले नाहीत. पुढे येऊ पाहणाऱ्या माणसांना गायब करण्याचे काम … Read more

पुणे जिल्हा | आंबेगाव वसाहतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव वसाहत (ता.आंबेगाव) येथे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची १११ वी जयंती यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशराव घोलप, सरपंच प्रमिला घोलप, उपसरपंच परविन पानसरे ,ग्रामपंचायत सदस्य मिलिंद भांगरे, विजय … Read more

पिंपरी | यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार – उल्हास जगताप

पिंपरी, (प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, एक थोर विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकनेते होते. देशाला आणि मुख्यत्वे महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर कसे नेता येईल, याचा विचार त्यांनी केला. राजकारणाप्रमाणे त्यांना साहित्य, कला, समाजकारण या विषयांमध्येही विशेष रस होता. त्यांच्या व्यापक सामाजिक विचारांचा वारसा यापुढेही जोपासला गेला पाहिजे, असे प्रतिपादन अतिरिक्त … Read more

पिंपरी | यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेस शहर अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी पाणी पुरवठा अभियंता अभिषेक शिंदे, आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल टकले, करसंकलन लिपिक प्रवीण माने, मयूर दिलोड, आशिष दर्शले, आदेश … Read more

सातारा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

सातारा – राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी … Read more

सातारा – संगणकीकृत सोसायट्यांमधून पारदर्शक सेवा शक्‍य

सातारा – केंद्र शासन पुरस्कृत विकास सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण करण्याचा महत्वाकांशी प्रकल्प सध्या राज्यात सुरु आहे. देशातील जवळपास 63 हजार विकास सेवा संस्था एक सॉफ्टवेअर प्रणालीशी जोडण्यात येणार आहेत. त्यात राज्यातील जवळपास 12 हजार संस्था जोडण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे विकास सेवा संस्थाच्या कामकाजामध्ये एकसूत्रता राहणार असून, शेतकऱ्यांना जलद, अचूक व पारदर्शक सेवा मिळणार आहे, … Read more

सरकारची राजकीय दहशत आदित्य ठाकरे झुगारून लावतील

कराड  – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून राजकारणाचा वापर करत नागरिकांना दहशतीखाली ठेवले जात आहे. नुकतेच बाजारसमितीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झालेले प्रवेशही याच दहशतीचा एक भाग होता. या पार्श्वभूमीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनंतर आदित्य ठाकरे कराड-पाटण दौऱ्यावर येणार असून जनतेला या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन करून त्यांची दहशतही ते झुगारून लावतील, असे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब … Read more

शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस केले अभिवादन; पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित

कराड – राज्यातील मोठ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील प्रीतिसंमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून दर्शन घेतले. महाविकास आघाडीतील दोन्ही दिग्गज नेत्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी एकत्रितपणे उपस्थिती दर्शवत अभिवादन केल्याने राज्याच्या आगामी राजकारणासाठी हा मोठा संकेत मानला जात आहे. येथील … Read more

सत्ता येते,सत्ता जाते, मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही – शरद पवार

मुंबई – सत्ता येते, सत्ता जाते मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही असा अनुभवाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना दिला. शरद पवार यांनी राज्यातील घसरलेल्या राजकीय पातळीबाबत माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया मांडली. शरद पवार म्हणाले की, “मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंसोबत माझे जाहीर मतभेद असायचे. त्यावेळी एकमेकांसाठी … Read more

यशवंतराव चव्हाण यांचे कार्य सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजले पाहिजे-खा. श्रीनिवास पाटील

कराड -स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी देशातील पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना सातारा येथे केली आहे. तसेच स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोपविलेली देशाच्या संरक्षणमंत्री जबाबदारही त्यांनी सक्षमपणे पार पाडली. त्यांचे कार्य या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचले पाहिजे, असे मत खा.श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. सातारा सैनिक स्कूल संदर्भात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व शाळा व्यवस्थापन … Read more