काय कराल मान अवघडल्यास?

आडवे तिडवे झोपल्यामुळे, हात दाबून झोपल्यामुळे, सोफ्यावर मागे मान टेकून झोपल्याने, खूप जास्त वेळ फोनवर बोलणे किंवा उंच उशी घेऊन झोपल्यामुळे मान आणि खांदे यांमध्ये वेदना होऊ लागतात. अनेकदा स्नायू किंवा नसांवर दबाव येतो. त्यामुळेही मान दुखते. फोनवर बोलताना इअरफोन लावा – खूप जास्त वेळ फोनवर बोलावे लागत असेल तर फोन हातात पकडून, गाल चिकटवून … Read more

मधुमेहाविषयी बोलू काही…

मधुमेह… सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्यांमधील प्रमुख घटक असून, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेह हा पूर्णपणे बरा न होऊ शकणारा एक प्रदीर्घ आजार आहे. यावर फक्‍त नियंत्रण ठेवले जाऊ शकते. यात रक्‍तातील दीर्घकालीन वाढलेल्यासाखरेमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर आणि महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होतात. मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, अंधत्व, वंध्यत्व, सूक्ष्म रक्‍तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, … Read more

निरोगी जीवनशैली

आहार, विहार आणि निद्रा यावरच सर्व शरीरक्रिया, आरोग्य अवलंबून आहे. अन्न हे प्राणधारण करणाऱ्यांचा प्राण आहे. म्हणून ह्या सृष्टीतील सर्व सजीव अन्नामागे धावत असतात. शरीराचं बळ, वर्ण, पुष्टी, बुद्धी आणि सुख अन्नावरच अवलंबून आहे. आपण अन्नाचं ग्रहण करताना खरंच ह्या बाबींचा विचार करतो का? अन्नाची निवड करताना काय खावं आणि काय खाऊ नये, हे समजून … Read more

मेंदू तल्लख बनवते ब्राह्मी वनस्पती; जाणून घ्या इतरही औषधी गुणधर्म

ब्राह्मी हे नाव बह्मापासून व देवी सरस्वती यांपासून निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष ब्रह्माण्डाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मांपासून त्याची उत्पत्ती समजली जाते. ब्रह्मा जसे बुध्दी व स्मृती यांचे प्रतिक आहे तसेच ही वनस्पती स्मरणशक्‍ती व मेंदुची बौद्धिक कार्यक्षमता वाढविण्यास उत्तम प्रकारे काम करते. मेंदू व मज्जासंस्थेवर नियंत्रण करणारी व त्यांचे कार्य उत्तम प्रकारे करणारी वनस्पती म्हणून ब्राह्मीला … Read more

हे आहेत भारतातील ‘योग सप्तर्षी’

पुणे –  आज देश-विदेशातील लोक योग शिकण्यासाठी भारतात येतात. खरं तर हे त्याच योगगुरूंच्या परिश्रमांचे फळ आहे, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन योगाच्या नावाखाली समर्पित केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अशा काही महान योग ‘योग सप्तर्षी’ बाबत माहिती करुन घेऊया…. देशभरात आज सातवा योग दिवस साजरा केला जात आहे, 21 जून हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस … Read more

योगा लाईफस्टाईल : नाडी शुद्धी प्राणायाम

आपल्या शरीरातील 72000 नाड्यांची शुद्धी अनुलोम-विलोम प्राणायामाद्वारे होत असते. इतका महत्त्वाचा शरीर शुद्ध करणारा हा प्राणायाम प्रत्येकाने रोज नियमित केला पाहिजे, असे योगशास्त्र म्हणते. या प्राणायामाद्वारे नाडी शुद्धी होते. याचा सराव जर योग्य असेल तर प्राणायामाच्या इतर अवघड प्रक्रिया सुलभपणे करता येतात. नाकपुड्या बंद करण्याची रीत प्रथम प्रणव मुद्रा बांधावी. अंगठ्याशेजारील दोन्ही बोटे-तर्जनी व मध्यमा … Read more