Pune News : मध्य प्रदेशातील तरुणाकडून सात दुचाकी हस्तगत; खडक पोलिसांची कामगिरी

पुणे – खडक पोलिसांनी संशयावरुन अटक केलेल्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. एका वाहन चोरीच्या गुन्हयाचा तपास करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. गोवर्धनप्रसाद ललवा साहू (३५ , रा.स.नं.१२० किष्कींदानग, कोथरुड, मुळ जिल्हा-उमरीया, मध्यप्रदेश ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात मिक्सर दुरूस्तीचे काम करतो. त्याच्यावर २०१८ मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात … Read more

मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट ! २००-२५० समर्थकांनी तरुणाला घरात घुसून केली बेदम मारहाण

Manoj Jarange – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने दीपक बद्री नागरे (वय 35, रा. मुकुंदवाडी) याला दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावाने घरातून बाहेर काढत बेदम मारहाण केली. मारहाण करतच त्‍याला … Read more

पुणे जिल्हा : तरुणाच्या जीवावर बेतला व्यायाम

– दुर्दैवी घटनेमुळे भोलावडे गावांवर शोककळा भोर – भोर-पुणे मार्गावरील हाॅटेल पद्मावतीजवळ व्यायाम करत असताना अजय काळू भोसले (वय २१, रा. भोलावडे ता.भोर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. भोर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय सुरेश भोसले याचा चुलत भाऊ अजय काळू भोसले हे दोघेजण भोलावडे येथील पद्मावती हॉटेल (कान्हेगुरुजी नगर) समोर थांबले होते. … Read more

अमेरिकेत जहाजावर ‘मारिन इंजिनिअर’ म्हणून निवड झालेला तरुण बेपत्ता; मुलाच्या वडिलांची वारजे पोलिस ठाण्यात तक्रार

पुणे – अमेरिकेत जहाजावर ‘मारिन इंजिनिअर’ म्हणून निवड झालेला पुण्यातील तरुण अमेरिकेहून सिंगापूरच्या दिशेने निघालेल्या जहाजावरून बेपत्ता झाल्याची घटना तक्रार अर्जमुळे समोर आली आहे. याबाबत तरुणाच्या वडिलांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र विभागाशी संपर्क साधून माझ्या मुलाचा शोध घ्यावा, अशी विनंती तरुणाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. प्रणव गोपाळ कराड … Read more

pune news : पायी जाणाऱ्या तरुणाला भरधाव कारने चिरडले

पुणे : पायी जाणाऱ्या दोन मुलांना कारने धडक दिली त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कोंढवे गेट येथे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अजिंक्य केदार पाटील ( १७, रा. कोंढवे धावडे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर मनिष तावरे (१७) असे जखमीचे नाव आहे. याबाबबत कारचालक अजिंक्य आघाडे … Read more

पुणे जिल्हा : बिबट्याने हल्ला केलेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील सुतारठिके वस्ती येथे मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला होता या तरुणाचा मंगळवार दि.५ रात्री उपचरादरम्यान मृत्यू झाला या तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली मंगेश रामदास गुंजाळ (वय २६ वर्ष रा. कांदळी, ता.जुन्नर) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती कांदळी येथील … Read more

pune news : जीवघेण्या नायलाॅन मांज्याची विक्री करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

पुणे : संक्रातीला जीवघेण्या नायलाॅन मांज्यामुळे गंभीर स्वरुपाच्या दुर्घटना घडल्या आहे. पंधरा ते वीस दिवसांवर संक्रात येऊन ठेपलेली असताना बंदी घातलेल्या नायलाॅन मांज्याची विक्री करणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी धनकवडी भागातून अटक केली. वेदांत राकेश गाढवे (वय १९, रा. शंकरमहाराज वसाहत, चव्हाणनगर, धनकवडी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम … Read more

पुणे जिल्हा : कारेगावातील तरुणाचा खून झाल्याचे उघड

रांजणगाव पोलिसांकडून आरोपीला बेड्या रांजणगाव गणपती – कारेगाव (ता. शिरुर) येथील फिनिक्‍स सिटीच्या प्लॉटिंगमधील ऑफिसचे शेडमध्ये प्लॉटिंगमध्येच झालेल्या तरूणाच्या मृत्यूप्रकरणाचा तपास घात झाल्याचे निष्पन्न झाल्याने रांजणगाव पोलिसांनी आरोपीला पुणे हडपसर येथून ताब्यात घेतले. कारेगाव येथे विठ्ठल केशव शेळके (वय 35, रा. मुंडेकरवाडी, जि. नगर) याचा मृतदेह (दि.5) आढळला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली … Read more

Pune Gramin : खार ओढ्यात पाय घसरून पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

शिरूर – कवठे येमाई (ता.शिरुर) येथील इनाम वस्ती नजीक असणाऱ्या खार ओढ्यात पाय घसरून पाण्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी मंगळवार (दि. २६) रोजी सापडला आहे. कवठे येमाई येथील इनाम वस्ती परिसरातील खार ओढ्यात पाय घसरून राजेंद्र विक्रम कोळी (वय २५, रा. मालखेडा, ता मुक्ताईनगर जि. जळगाव) हा तरुण बुडाल्याची घटना घडली होती. रविवार (दि. … Read more

नागपूरमध्ये तरुण-तरुणीने गळफास घेत संपवले जीवन; परिसरात एकच खळबळ

नागपूर :  नागपूर  जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात एका तरुण-तरूणीने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. आत्महत्या करणारे प्रेमीयुगल असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नागपुरच्या पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात हा धक्कादायक प्रकार घडला असून गौरव बगमारे आणि जान्हवी नायले असे … Read more