पालखीच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या तयारीत असलेले दोघे जेरबंद

पुणे – पालखीच्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल, मंगळसूत्र आणि पाकिट चोरी करणाऱ्यांच्या टोळ्या शहरात दाखल होत असतात. तसेच स्थानिक चोरटेची गर्दीचा फायदा घेत संधी साधत असतात. अशाच दोन मोबाईल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे सात मोबाईल ताब्यात घेतले आहेत. देहू येथून संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराज 10 जून व 11 जून रोजी आळंदी येथुन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजाचे पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या अनुषंगाने पुणे शहर

पोलीस दलाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताची आखणी केलेली आहे. पालखी सोहळयाचे दिनांक 11 जुन रोजी पुण्यात आगमण होणार असुन 11 व 12 तारखेला पुण्यात मुक्कामी आहे. त्यादृष्टीने गुन्हे शाखेची खास पथके तैनात करण्यात आलेली आहेत. पालखी सोहळ्यामध्ये गर्दिचा फायदा घेवुन चैन चोरी व मोबाईल चो-या करणारे चोरटे सक्रिय होत असतात.

त्या अनुषंगाने ही पथके कामकाज करत आहेत. पालखीचे अनुषंगाने युनिट पाचकडील पथक हडपसर व वानवडी पोलीस हद्दीत पालखी मार्गावर गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. यावेळी त्यांना पालखीच्या वेळी वारक-यांचे गर्दीचा फायदा उठवत मोबाईल चोरी करण्याचे इरादयाने शहरात फिरत असलेल्या चोरट्यांबाबत खबर मिळाली.

त्यानूस हडपसर येथील रविदर्शन चौकात श्रीकांत राजु जाधव (21, रा. दर्ग्याजवळ, सर्वोदय कॉलणी, मुंढवा ) आणि दिलीप बलभिम गायकवाड (33, रा. सर्वोदय कॉलणी, मुंढवा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेता त्याचेजवळ 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे एकुण 7 मोबाईल फोन मिळाले . त्याचेकडे सखोल तपास करता त्यांनी ते मोबाईल फोन हे हडपसर, मुंढवा, बंडगार्डन, बिबवेवाडी या भागातुन गर्दिचा फायदा घेवुन चोरलेले असल्याचे सांगीतले.

आरोपी चोरलेले मोबाईल फोन हे कर्नाटक येथे पाठविण्याचे तयारीत होते. आरोपी श्रीकांत जाधव याचेवर घरफोडी, पाकिटमारी, मोबाईल चोरीचे एकुण 24 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक चैत्राली गपाट, अविनाश लोहोटे, पोलीस अमंलदार रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, दया शेगर, शशिकांत नाळे, विनोद शिवले, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, पल्लवी मोरे यांनी केलेली आहे.