तळीरामही युक्रेनच्या पाठिशी; “रशियन व्होडका” गटारीत टाकून व्यक्त केला पाठिंबा

नवी दिल्ली  – रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने जगभरात टेन्शन वाढलं आहे. बलाढ्य रशियाच्या युद्धाच्या धोरणाला जगभरातील अनेक देश विरोध करत आहेत. तर युक्रेनला पाठिंबा देत आहे. खुद्द रशियातील नागरिक देखील युद्धाच्या विरोधात आहे. त्यातच आता तळीरामांनी युक्रेनला पाठिंबा देत रशियाच्या धोरणाचा निषेध केला आहे.

तळीरामांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे तळीराम अमेरिकेतील असून ते व्हिडीओत रशियाचा निषेध करत आहेत. व्हिडीओमध्ये तळीराम रशियन व्होडका गटारीमध्ये टाकताना दिसत आहेत. अमेरिकेतील लास वेगास येथील हा व्हिडीओ आहे.

जगात सध्या तिसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत आहेत. तर त्याचवेळी जगभरातून या युद्धाला विरोध होताना दिसत आहे. युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘इस्कॉन’ने पूर्व युरोपीय देशातील गरजू लोकांसाठी मंदिरांचे दरवाजे उघडले आहेत. त्यांच्या या मदतीचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.


एकंदरीतच युक्रेनला पाठिंबा दर्शविण्यात येत असून रशियाला विरोध होतोय. मात्र जागतिक विरोधाकडे दुर्लक्ष करत रशियाने आपलं आक्रमक धोरण कायम राखलं आहे.