खुशखबर! ‘या’ कंपनीच्या कर्माऱ्याना मिळणार ‘पगारवाढ’

मुंबई, दि.22- टीसीएस ही स्वॉफ्टवेअर कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना 2021-22 साठी पगारात वाढ करून देणार आहे. माहीती तंत्रज्ञान कंपन्यावर लॉक डाऊनचा जास्त परिणाम झाला नव्हता. उलट या कंपन्याया उलाढालीत वाढ झाली होती.

या पगारवाढीचा फायदा तब्बल 4.7 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे होळीआधी कर्मचाऱ्यांना मिळालेली ही खूशखबर आहे. 2020 मध्ये जेव्हा कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अनेकांवर आर्थिक संकट कोसळले होते. अशा परिस्थितीतही टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले होते.

तेव्हा झालेली पगारवाढ आणि आता होणारी पगारवाढ लक्षात घेता, कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 14 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. केवळ पगारवाढच नाही तर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशनही केले होते. आता पुन्हा होणारी पगारवाढ हेच संकेत देत आहे. टीसीएसही टाटा ग्रूपची कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय देशाची मुंबईत आहे.

Leave a Comment