Teacher Recruitment : राज्यातील शिक्षक भरतीसाठी 30 हजार रिक्त पदांची जाहिरात लवकरच; दीपक केसरकर

Maharashtra Teacher Recruitment : राज्यातील  शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची   जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. राज्यात शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

राज्यात (Maharashtra News) शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

23 जिल्ह्यांतील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी लवकरच जाहीरात (Maharashtra Teacher Recruitment Updates)
गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली होती. पण आता अखेर शिक्षक भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून 23 जिल्ह्यांतील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी लवकरच जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासंदर्भात तारीख जरी अद्याप निश्चित करण्यात आलेली नसली, तरी यासंदर्भात तातडीची पावलं राज्य सरकारकडून उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.