पिंपरी | तेलंग हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयास नॅकचा बी प्लस श्रेणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेने(नॅक) केलेल्या या तपासणी समितीकडून ’बी प्लस ग्रेड’ प्राप्त झाला आहे. नॅककडून 2.64 (सीजीपीए) गुण मिळवत हे यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अजय कुमार राय यांनी दिली.

100 टक्के उत्कृष्ट निकाल, कँपस प्लेसमेंटच्या माध्यमातून देशात, परदेशात हमखास नोकरी आणि इंटर्नशीप,असा संस्थेचा नावलौकिक आहे. संस्थेतील जास्तीत जास्त विद्यार्थी पुणे, मुंबई व गोवा येथील पंचतारांकित हॉटेल्समध्ये महत्वाच्या व जबादारीच्या पदांवर आहेत,

तर काही विद्यार्थ्यांची अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, मालदीव, फ्रान्स येथे निवड झाली आहे. या वर्षी संस्थेतील व्दितीय वर्षातील 12 विद्यार्थ्यांची फ्रान्स मध्ये इंटर्नशिप साठी निवड झालेली आहे. तर दरवर्षी संस्थेचे विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतदेखील झळकत असतात.

सेवा व त्याग असे ब्रीद असलेली ही संस्था कमीत कमी शुल्कात गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याची परंपरा यापुढेहि कायम ठेवेल. कौशल्य आधारित कोर्स सुरू असल्याने उत्तम आणि दर्जेदार संस्थेमधून पदवी घेतल्यास यश नक्कीच मिळेल,, असा विश्वास संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती व प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी व्यक्त केला.