Sharad Pawar । काका-पुतण्या फुटीसाठी मुंडेंचा आव्हाडांवर ‘ठपका’ ; शरद पवार यांनी पक्षातील कालखंडच काढला…

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये इच्छूका उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

अशात उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. त्यांच्या उपस्थितीत बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा देखील होणार आहे. अशात अजित पवार यांनी अशाच एक सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसेच लोकसभेत निवडणुकीबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे.

या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. ते म्हणाले दोन्ही पवारांच्यात जे अंतर पाडले ते जितेंद्र आव्हाड यांनी पाडले आणि जयंत पाटील व सुप्रिया सुळे यांना बाजूला सारत जितेंद्र आव्हाड हे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप  धनंजय मुंडे यांनी केला होता.

 नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे 
‘त्यांचा राष्ट्रवादी मधील कालखंड जो गेला त्यापेक्षा कितीतरी अनेक वर्ष आव्हाड हे पक्षाच्यासाठी काम करत आहेत. त्यांनी देशपातळीवर काम केले. राज्य पातळीवर काम केले. संस्थात्मक पातळीवर काम केले. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही काम केले आहे. राज्य मंत्रिमंडळा मध्ये सुद्धा त्यांनी काम केले आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी कोणतीही वेगळी भूमिका त्यांनी घेतली असं नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं, याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही असा टोला त्यांनी मुंडे यांना लगावला.’

शरद पवार यांचे प्रतिउत्तर
 शरद पवार म्हणाले की, ‘धनंजय मुंडे यांच्या कितीतरी वर्ष आधीपासून जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे. युवक अध्यक्ष ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. संघटन पातळीवरही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं, याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.’

हेही वाचा
शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘चिन्हाची चिंता नाही वेगवेगळ्या पाच चिन्हावर निवडणूका जिंकलो’


अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचे सडेतोड उत्तर…वाचा