आरोग्यदायी लवंग खाण्याचे फायदे 

लवंग आपल्या प्रत्येकाच्या घरात पहायला मिळते, तो एक मसाल्याचा पदार्थ आहे. परंतू त्याचा आयुर्वेदामध्ये देखील वापर केला जात होता. आयुर्वेदामध्ये या मसाल्याचा उपयोग अनेक रोगांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. लवंग या पदार्थास आयुर्वेदामध्ये औषधींचा गुरू मानले जाते.

आज जाणून घेऊया लवंग खाण्याचे फायदे   

थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला सर्दी खोकल्याचे त्रास होतात, त्यासाठी लवंगाच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवा, जेव्हा आपले नाक बंद होईल किंवा सर्दी झाल्यास एकदा वास घेतला तर आपले नाक पटकन मोकळे होते.

कोणी आपल्याला तोंडाचा वास येतोय मग एक लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंध एका पटकन् दूर होऊ शकतो आणि मोकळा आणि फ्रेश श्‍वास बनतो.

आपल्या जेवणाच्या अनियमित वेळेमुळे त्याचा आपल्या शरिरावर विपरीत परिणाम होवून काहींना ती अ‍ॅसिडीटी जाणवते, त्यासाठी 100 ग्राम पाण्यामध्ये लवंगचा खिस करून चांगले मिसळून प्यावे. असे केल्यास आपली अ‍ॅसिडिटी लवकर बरी होते.

सांधेदुखी गुडघेदूखी असल्यास त्यावर उपाय म्हणून आपण लवंगचे तेल त्या जॉईंटवर लावल्यास त्यांचा बर्‍यापैकी त्रास कमी होतो.

जास्त घाम येत असल्यास त्यावर उपाय म्हणून गरम पाण्यामध्ये लवंग वाटून ती पाण्यात मिसळून पिल्यास या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो.

हैजा सारख्या भयंकर रोगावर देखील लवंग गुणकारी ठरते. त्यावर उपाय म्हणून लवंगचे तेल बताश्यामध्ये टाकून खावे.

Leave a Comment