मतदान टक्का वाढवण्याचे प्रशासनापुढे आव्हान

सातारा – जिल्ह्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघे ६०.३९ टक्के मतदान झाले होते. ही टक्केवारी देश, राज्याच्या तुलनेत कमी होती. आता मात्र हे चित्र बदलण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्यासाठी गेल्या निवडणुकीत मतदान ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झालेल्या २४३ मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान होण्यासाठी तसेच जिल्ह्याचे मतदान तब्बल ७५ टक्क्यांवर नेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नांची बाजी लावली आहे.

लोकशाहीत मतदानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत सरासरी ६० टक्क्यांच्या आसपास मतदान होते. जिल्हा प्रशासन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी १०० टक्के मतदान होण्यासाठी नियोजनबध्द कामकाज सुरु ठेवले आहे.

जिल्हा प्रशासनाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या २४३ केंद्रांची यादी तयार केली आहे. तेथे मतदान जनजागृती करण्यासाठी ३९ पथके तयार केली आहेत. त्यामध्ये गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, बीएलओ यांचा समावेश आहे. याशनी नागराजन या पथकांच्या कामाचा आढावा घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी किमान १० जणांना मतदानास प्रवृत्त करण्याचा निर्धार केला आहे.

हीच ती २४३ मतदान केंद्रे…
सातारा मतदारसंघ : रवंडी, मरडमुरे, खिरखिंडी, बापोशी, ३१७ रविवार पेठ सातारा, विशाल सह्याद्री विद्यालय शाहूनगर, शेंद्रे, गुरुकुल विद्यामंदिर शाहूनगर, पोलीस हेड क्वार्टर सातारा ट्रेनिंग सेंटर, २८७ नगरपालिका शाळा क्र. २३, वहागाव, सह्याद्री माध्यमिक विद्यालय शाहूनगर (दोन), वाकी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडोली, कुंभारगणी, २८० सदरबझार १, सांगवी, पोलीस वसाहत गोडोली, गुरुकुल विद्यालय बालवाडी, २६७ राधिका रोड, २४३ आयटीआय गेंडामाळ, २८९ नगरपालिका शाळा क्र. २३, ३४२ गोडोली, ३१८ नगरपालिका शाळा क्र. १९, रेंडीमुरा, उंबरेवाडी, कोलाघर, नित्रळ, सावरी, ३१६ पोलीस बँड हॉल, २८१ सदरबझार, भामघर, आझाद कॉलेज, कुसुंबी, वडगाव, आलवडी, गवडी, असणी, एकीव, ३४३ गोडोली, डांगरेघर, वेळे.

पाटण मतदारसंघ : २४८ प्राथमिक शाळा खोली क्र. २, मेंढ, कोळेकरवाडी, उढावणे, घोटील (दोन), २४७ प्राथमिक शाळा खोली क्र. १, सडादांडोली, जिंती, आचरेवाडी, रुवले, निगडे, पाचगणी, चिखलेवाडी, वरापेवाडी, ढोरोशी, मातेकरवाडी, चव्हाणवाडी, कुंभारगाव, शेंडेवाडी, मुटातळवडी, आटोली, डाकेवाडी, शिवंदेश्वर, चिखलेवाडी, अंबवडे खुर्द, भारसखाले, रुवले, मरळी, करपेवाडी, सणबूर, मळा, वाजे, गलमेवाडी, डाकेवाडी, वचोली, कालगाव, बनपुरी (दोन), महिंद, तामिणे.
वाई मतदारसंघ : विवर, खेड बुद्रुक, शिरणार, खांड बुद्रुक(दोन), चकदेव, वढावळे, उळुंब, आसवडी, वेळे, घरसोली, देवसरे, लोणंद (दोन), अहिरे, घेराकेंजळ , कुमठे, वेळे, खांबील, गिरीस्थान, बिरवाडी, कुरोशी, शिंदी, खावली, कण्हेरी, दाभेमोहन, बोरी, आकोशी, खोल, अंदोरी, मढळ, लाखवड, जांब, सोनट, ३२६ पाचगणी, हातलोट.
कोरेगाव मतदारसंघ : कोडोली (तीन), पिरवाडी (पाच), ललगुण, सिध्दार्थनगर, विसापूर, कृष्णानगर, खिरखिंडी, उत्तर भीम, राजापूर, कृष्णानगर, विक्रांतनगर, वर्धनगड, कोरेगाव.

कराड दक्षिण मतदारसंघ : विठामाता विद्यालय कराड, गणेशवाडी, शिवनगर, येळगाव (दोन), शेवाळेवाडी (दोन), डिस्कळ, घोगाव, शेवाळेवाडी, भरेवाडी, कराड १२१ नगरपालिका शाळा, १२२ नगरपालिका शाळा, रोटरी शिक्षण संस्था, कोळे.
कराड उत्तर मतदारसंघ : भैरवगड, खुबी, अंभेरी (दोन), म्हासुर्णे, यशवंतनगर, १४२ रहिमतपूर (दोन), वेळू, बाबरमाची.
माण मतदारसंघ : वडी, वडूज (तीन), चिल्लरवाडी, म्हसवड (दोन), पाचवड, गणेशवाडी, मलवडी, पळसगाव, खातवळ, कुकुडवाड, अंभेरी (दोन), मुळीकवाडी, अ. रांजणी, पांचवड, येळीव, कुकुडवाड, काटेवाडी, टाकेवाडी, विरळी, रांजणी, मानेवाडी, जांभुळणी, वीरकरवाडी, येरळवाडी, औंध (दोन), वळई, खातवळ, गोरेगाव, टाकेवाडी, गुरसाळे, दोरकेवाडी, निमसोड.

फलटण मतदारसंघ : चवणेश्वर, रणदुल्लाबाद (दोन), करंजखोप (तीन), सोनके (दोन), दहिगाव, यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण, पिंपोडे बुद्रुक, ढिगेवाडी, मुधोजी विद्यामंदिर फलटण, खामगाव, तडवळे.

सातारा शहरात उदासीनता
सातारा, वाई, पाटण या मतदारसंघातील ४० पेक्षा जास्त मतदान केंद्रांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे. त्यात सर्वाधिक मतदान केंद्रे सातारा शहरातील आहेत. येथील मतदान वाढवण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवारांना जनजागृती करावी लागणार आहे.