नगर | कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

नगर – तालुक्यातील वारूळवाडी येथे खडी क्रेशरवर काम करणार्या परजिल्ह्यातील कामगाराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्ंतोष गंगाराम पंडित (वय ३५, रा. ब्राम्हणवाडा, हिंगोली, हल्ली रा. शेंडी) असे मयताचे नाव आहे.

संतोष पंडित हा गेल्या काही दिवसापासून वारूळवाडी शिवारात असलेल्या खडी क्रेशरवर काम करत होता. शुक्रवारी (दि. ३१) रोजी सकाळी कामावर आल्यावर त्याने खडी क्रेशर वरच गळफास घेतला.

ही घटना लक्षात आल्यावर त्याचा भाऊ दादाराम मुकुंदा पंडित याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. खेडकर यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.