कोरोनाच्या संकटामुळे लोकांवरील कर्जाचे ओझे दुप्पट

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटाचा सामना आपण सर्वजण करत आहोत. जवळपास समाजातील सर्वच घटकांवर याचा परिणाम झालेला आहे. सामाजिक घटकांची अवस्था सुद्धा बिकट झालेली आहे. याचा सर्वात मोठा फटका आर्थिकतेला बसला. कोरोनाकाळापूर्वी देशाची आर्थिक स्थिती नाजूक होती. कोरोनामुळे तर लोकांवरील कर्जाचा ओझा दुपटीने वाढला आहे.

यादरम्यान 18 राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील सरासरी कर्ज वाढून दुपटीहून अधिक झाले महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांतही ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही क्षेत्रात कर्जाचे प्रमाण दुपटीने वाढले.

शहरी भागातील नागरिकांवरील कर्ज 2012 च्या तुलनेत 2018 मध्ये 42 टक्क्यांनी तर ग्रामीण भागातील 84 टक्क्यांनी वाढले. कोरोनाने ही स्थिती आणखीच खालावली. 2018 च्या तुलनेत 2021च्या कोरोना काळात कर्जाचे प्रमाण वाढले. लोकांना आपल्याजवळील दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू गहाण ठेवून गुजराण करावी लागत आहे. अनेकांनी तर व्याजावर पैसेही घेतले आहेत.