मृतांचा आकडा काही कमी होईना! २४ तासांत तब्बल साडे तीन हजार बाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला आपल्या विळख्यात घेतले आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात तीन लाख 68 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन लाख 732 रुग्ण उचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील दररोजच्या करोना परिस्थितीचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशभरात ३ लाख ७३२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर दिवसभरात तब्बल ३ हजार ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूच्या नव्या आकडेवारीसह देशातील एकूण करोना मृतांची संख्या २ लाख १८ हजार ९५९ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३४ लाख १३ हजार ६४२ रुग्ण उपचार घेत आहेत.

देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी ४९ टक्के रुग्णसंख्या फक्त पाच राज्यांतील आहे. यात महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील विविध राज्यांनी लॉकडाउन वा कडक निर्बंध लागू केले आहेत. हरयाणा सरकारनेही आता लॉकडाउनचा निर्णय घेतला असून, वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने लॉकडाउनचा विचार करण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयानेही दिला आहे.