मतदानाचा डेटा सार्वजनिक करण्याच्या मागणीला बसला झटका, सर्वोच्च न्यायालय म्हणाले,’निवडणुकीनंतर निर्णय…’

Lok Sabha Election 2024 ।  लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीत अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदानाची टक्केवारी वेगळी तर आठवडाभरानंतर त्यात फरक असल्याचा दावा अनेक राजकीय पक्ष करत आहे. या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती.

फॉर्म १७ सीची स्कॅन कॉपी वेबसाइटवर अपलोड करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी यात करण्यात आली होती. यावर निवडणूक आयोगाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात 225 पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते या प्रकरणावर आज 24 मे रोजी सुनावणी होणार झाली.