पुणे जिल्हा | मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम नाटिकेेने वेधले लक्ष

पौड (वार्ताहर)- मुळशी तालुक्यातील पौड येशील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांचे प्रतिमा पूजन केंद्रप्रमुख येनपुरे सर, माणकोजी सर व पौड गावचे विद्यमान सरपंच प्रमोद शेलार यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम यावरती केलेले नाटक सादर केल्याने पालकांकडून उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून पालकाची वाहवा मिळवली.

विद्यार्थिनींनी मंजूळ आवाजात स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येनपुरे सर यांनी आपले मनोगतामधुन विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यालयाच्या प्राचार्या सोनाली साळुंखे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व उपस्थित पालकांचे व मान्यवरांचे विदयालयाच्या वतीने स्वागत केले.

यावेळी मुख्याध्यापक भोकरे सर, पौड गावचे सरपंच प्रमोद शेलार, उपसरपंच प्रितीताई आगनेन, माजी सरपंच अजय कडू, सदस्य नंदाताई नवले, रसिका जोशी, सतीश थरकुडे, मंदार इंगुळकर, महेश आल्हाट, अमोल केदारी अनिल केदारी, कुंडलिक हुलावळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य सोनाली साळुंखे याच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षिका प्रणिता केदारी, रुपाली केदारी, स्वाती शेलार, अश्विनी पाटील, प्रतिक्षा शिंदे, पल्लवी बर्वे, काजल केदारी प्राजक्ता लोंढे, ज्योती शिंदे, स्वाती तिकोणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी मनिषा वाचकवडे व मंदा जायगुडे यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून उत्तम छत्रपती शिवाजी महाराजांची गीते, देव देवतांची गीते, यादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रूपाली केदारी व पल्लवी बर्वे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणिता केदारी यांनी केले.