महाळुंगे इंगळेत आढळला पहिला करोना रुग्ण

आंबेठाण – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे सोमवारी (दि. १५) रात्री एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती पिंपरी-चिंचवड येथे कामानिमित्त जात होती. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आज येणार आहे त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काळजी घ्या सुरक्षित रहा तसेच प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करा असे आवाहन तलाठी शाम वालेकर यांनी ग्रामस्थांना केले आहे.

Leave a Comment