भारतात बनवलेली पहिली कोविड नेजल वैक्सीन; 26 जानेवारी रोजी लाँच केली जाईल, किंमत आहे, ‘इतकं’

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनामुळे झालेल्या विध्वंसाची सर्वांनाच जाणीव झाली आहे. अशात लस हे कोरोनाविरुद्धचे सर्वात महत्त्वाचे शस्त्र मानले जात आहे. आता भारत बायोटेक 26 जानेवारीपासून देशात विकसित केलेली पहिली इंट्रानासल कोविड-19 लस ‘इन्कोव्हॅक’ लोकांना देण्यास सुरुवात करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इला यांनी शनिवारी ही माहिती दिली.

भोपाळ येथे आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF) मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, कृष्णा इला यांनी सांगितले की, गुरांना गुरांचे त्वचेच्या आजारापासून वाचवण्यासाठी देशी बनावटीची लंपी प्रोव्हाकिंड ही लस पुढील महिन्यात लाँच केली जाईल. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MANIT) येथे आयोजित IISF च्या “फेस टू फेस विथ न्यू फ्रंटियर्स इन सायन्स” मध्ये भाग घेतला.’

या कार्यक्रमाविषयी माहिती देताना कृष्णा इल्ला म्हणाले, “आमची नाकातील लस (नाकातून दिली जाणारी लस) अधिकृतपणे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी लाँच केली जाईल.” भारत बायोटेकने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की, ते इंट्रानाझल लस विकणार आहेत. सरकारकडून प्रति डोस ३२५ रुपये, तर खासगी लसीकरण केंद्रांना प्रति डोस ८०० रुपये मोजावे लागतील.