पुणे | मग्रुरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही -रोहित पवार

पुणे- सत्तेत असताना मग्रुरीची भाषा वापरत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दिला. येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते़.

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला केलेल्या दमदाटीबद्दल भरणे यांनी मी शिवीगाळ केली नाही. माझी ग्रामीण भाषा आहे, या केलेल्या खुलाशावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ही भाषा विधानसभेच्या अधिवेशनात वापरली तर अध्यक्ष परवानगी देत असतील तर काहीच हरकत नाही़.

हीच त्यांची असंविधानिक भाषा महिला अथवा सुज्ञ व्यक्तींसमोर वापरली तर गुंडागर्दीची भाषा म्हणावी लागेल़. तिथे उपस्थित असणारी गवळी नावाची व्यक्ती आणि भरणे तसेच भरणे नावाच्या काही व्यक्ती बुथवर बसले होते़. अठरा पगड जातीतील सामान्य कार्यकर्ते बसले असताना तुम्ही सत्तेत असताना मगु्ररीची भाषा वापरत असाल तर हे लोक खपवून घेणार नाहीत़. याबाबतची तक्रार केली आहे़.