राज्यसभेसाठी भाजपच्या ‘या’ नेत्यांच्या नावाची यादी झाली फायनल ; लवकरच अंतिम निर्णय

Rajya Sabha Election :  महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये महाराष्ट्रातील महायुतीच्या वाट्याला यातील पाच जागा येण्याची शक्यता वर्तवली जात. या पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या (BJP) वाट्याला येणार आहेत.

अशात भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवारांच्या नावाची यादी समोर येत असून, ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.

 भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवारांच्या नावाची यादी पुढील प्रमाणे

नारायण राणे

विनोद तावडे

पंकजा मुंडे

विजया राहटकर

अमरीश पटेल

माधव भंडारी

चित्रा वाघ

हर्षवर्धन पाटील

संजय उपाध्याय