चोरांचा सुळसुळाट; महिला सरपंचांचे मंगळसूत्र हिसकावले

वाघळवाडी (प्रतिनिधी) : वाघळवाडी तालुका बारामती येथे निरा-बारामती रस्त्यावर व्यायामासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याचा प्रयत्न झाला. आज पहाटे ५.३० दरम्यान हि घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, आज पहाटे ५.३० वा सरपंच नंदा सकुंडे व ४ ते ५ महिला व्यायाम साठी निरा-बारामती रोड ने चालत होत्या त्यावेळी मोटारसायकलवर दोन अज्ञात व्यक्तींनी सरपंच नंदा सकुंडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकविण्याचा प्रयत्न केला. ते तुटले व खाली पडले. शेजारील महिलांनी आरडाओरड केल्यामुळे चोरांनी पळ काढला. सर्व महिला खूप घाबरल्यात्यामुळे महिलांच्यात भितीचे प्रमाण वाढले.

मागील दोन दिवसापूर्वी गावातील उप सरपंच जितेंद्र सकुंडे यांच्या ऑफिसमधील एलईडी टीव्हि संच व सेट ऑफ बॉक्स सहित इतर साहित्य चोरीला गेले आहे, तसेच वारंवार पेट्रोल, डिझेल, ४ चाकी, ट्रॅक्टर यांच्या बॅटरी तसेच इतर या चोरींचे देखील प्रमाण वाढले आहे. तरी सर्व चोरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी ग्रामस्थ महिलांनी केली आहे.

चोरांचा सुळसुळाट

कोरोनामुळे संपूर्ण देशामध्ये जवळपास तीन महिने लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यामुळे इतर व्यवसायावरती परिणाम झाला तसा अवैध धंद्यांवरतीही लॉकडाऊनचा परिणाम झाला.  त्यामुळे अवैध सावकारी, दलाली, मोठ्या जबरी चोऱ्या हेही अवैद्य धंदे बंद पडले.  यामुळे व्यसनाधिनतेच्या व ऐशो आराम जीवनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना आता पैसा मिळणे कठीण झाले आहे . त्यामूळे घरा बाहेर पडणाऱ्या नागरिकांना ते थेट लक्ष्य करू लागले आहेत .

Leave a Comment