शहरासह राज्यातील किमान तापमानात घट

पुणे – पुणे शहरासह राज्यातील किमान तापमानामध्ये पुन्हा घट होत आहे. सोमवारी पुण्यात किमान तापमान 16.3 अंश सेल्सिअस नोंदविले. राज्यात सर्वाधिक कमी तापमान नगरमध्ये 13 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात वाढ झाली होती.तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. त्यामुळे शहरात थंडी जाणवत नव्हती. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या शित लहरी कमी झाल्यानेसुद्धा किमान तापमानात वाढ झाली होती, पण रविवारी रात्रीपासून हवामान कोरडे झाल्याने तापमानात पुन्हा घट होऊ लागली आहे.

पुणे शहराचे किमान तापमान सोमवारी सरासरीपेक्षा दोन अंशाने कमी होते. किमान तापमानात घट होत असताना दुसरीकडे मात्र कमाल तापमानात वाढ झाली आहे. शहरात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदविले आहे.

Leave a Comment