‘चांदणे तुझ्या स्वरांचे सरता संपत नाही..’; अजय-अतुल यांनी दीदींना वाहिली श्रद्धांजली

मुंबई – भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधना मुळे आज संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सोशल मीडियावर लोक आपापल्या पद्धतीनं शोक व्यक्त करत आहेत. काहीजण त्यांच्या अनेक दशकांच्या गाण्याच्या कारकिर्दीबद्दल बोलत आहेत, तर काहीजण त्यांची

अनोखी आणि सदाबहार गाणी आठवत आहेत. जर आपण त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीबद्दल बोललो, तर त्यांनी सुमारे 70 वर्षे बॉलिवूड मध्ये गायन केलं आणि आपल्या सुंदर आवाजानं संपूर्ण विश्वाला मंत्र मुग्ध केलं.

दरम्यान, लतादीदींच्या निधनाने अवघ्या संगीतक्षेत्रावरही शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत संगीत जोडी अजय-अतुल यांनी दीदींना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.