चिंताजनक ! देशात कोरोनाबाधितांची संख्या सव्वाचार लाखांवर

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा थैमान काही केल्या कमी होत नाही उलट तो झपाट्याने वाढतच आहे. त्यातही गेल्या 24 तासात पहिल्यांदाच देशात 400 पेक्षा जास्त बळी कोरोनामुळे गेले आहेत. 24 तासात 445 बळींची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 821 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 26 हजार 910 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 37 हजार 252 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 55.77 टक्के आहे.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार सध्या कोरोनाची लागण असलेले 175,955 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 237,252 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 440 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या 13 हजार 703 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 132075 इतका झाला आहे. 65744 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. तर आतापर्यंत 6170 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment