…त्या पोलिसांच्या चौकशीचे पोलीस उपायुक्तांचे आदेश; डीसीपी ॲक्शन मोडवर

वाघोली (प्रतिनिधी) – लोणीकंद पोलीस ठाण्यातील एक अधिकारी व तीन कर्मचारी यांच्या विरोधात एका नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून या प्रकरणाची दखल सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी घेतली असून लोणीकंद पोलीस ठाण्यातील त्या चार पोलिसांच्या चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांना दिले आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन नुकतेच झाले होते. याच प्रकरणात लोणीकंद पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे चौकशीला आलेल्या अर्जावर योग्य ती चौकशी केली नाही. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबतीत न्याय मागितल्यानंतर या प्रकरणात न्याय मिळाला आहे.

याशिवाय इतर पोलीस कर्मचारी ज्यांनी शिवीगाळ दमदाटी व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्या नागरिकाने निवेदनात केला आहे. याबाबत सात दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश डीसीपी शशिकांत बोराटे यांनी याप्रकरणी दिले आहेत