शहर कचराकुंडी मुक्‍त करण्याच्या योजनेचा फज्जा

नगर – आगामी महिनाभरात शहर कचराकुंडी मुक्त करण्याचा मानस महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केला होता. त्यासाठी शहरातील 106 पैकी 45 ठिकाणच्या कचरा कुंड्या हटविण्यात आल्या असल्याचे ठिकाणी नागरिक कचरा टाकत आहेत. शहरात ठिक-ठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत.

त्यामुळे शहर कचराकुंडी मुक्त करण्याच्या योजनेचा फज्जाच उडाला असून त्याला नगरकरांचे ही सहकार्य लाभेना. त्यासाठी महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी 16 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.
शहरातील कचरा संकलनाचा ठेका पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट दिला आहे. मात्र, कचरा संकलन करणारे वाहने थांबत नसल्याने शहरातील नागरिक इतरत्र कचरा टाकत आहे.

त्यामुळे हा कचरा तसाच कचरा पडून राहत आहे. मात्र, शहरात घर ते घर कचरा संकलन करण्याचा डांगोरा पिटविला जात आहे. त्यात सुका व ओला कचरा असे वर्गीकरण करून हा कचरा 65 पैकी 50 स्वच्छता घंटा गाड्यांना जीपीएस ऍप बसविण्यात आले असल्याचे ही सांगण्यात येत आहे. मात्र त्याचे नियंत्रन कोनाकडे हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त यांनी नुकतेच स्वच्छ सर्वेक्षणाबाबत महापालिकेच्या 16 कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांनी प्रभागातील इतरत्र पडलेला कचऱ्याबाबत तसेच रस्ते सफाई, कचरा संकलन वाहतुक, रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्याबाबत, सार्वजनिक शौचालयाची देखबाल दुरुस्तीबाबत नियंत्रन ठेवण्यासाठी सोळा कर्मचाऱ्यांचे चार पथक तयार करण्यात आले आहे. हे पथकाला सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत तर तीन ते नऊ वाजेपर्यंत तैनात असणार आहे. त्यासाठी त्यांना प्रभागातील वार्ड ठरवून देण्यात आले आहे.

Leave a Comment