जवळा गावाची सत्ता युवकांच्या हाती, जनतेतून सरपंचपदी सुशील आव्हाड यांचा विजय 

जामखेड –  गेल्या १० दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. जवळा येथील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे. प्रशांत शिंदे गटाविरोधात गावातील सर्वच राजकीय नेत्यांनी एकत्र येत शेतकरी ग्रामविकास आघाडी उभी केली तर प्रशांत शिंदे गट यांच्या जवळा ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून सरळ लढत झाली. या प्रतिष्ठेच्या लढतीत प्रशांत शिंदे यांच्या जवळा ग्रामविकास पनल बाजी मारत जनतेतून सरपंच पदी सुशील आव्हाड हे सहाशे बत्तीस [ ६३२ ] मतांचे मताधिक्य मिळाले आहे. तर १५ ग्रामपंचायत सदस्या पैकी १० सदस्य हे जवळा ग्रामविकास पनलचे विजयी झाले आहे . तर दुसरा गट असलेला शेतकरी ग्रामविकास आघाडी यांना ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे चुरशीच्या लढतीत प्रशांत शिंदे ने मारलेली बाजी तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. या निवडणुकीत जवळा गावातील सर्वच विरोधक एकत्र येत त्यांनी शेतकरी ग्रामविकास आघाडी तयार केली. तर प्रशांत शिंदे यांनी युवकांना एकत्र घेत जवळा ग्रामविकास पनाल करत एक नवे आवाहन उभे केले ते आवाहन देखील शिंदे यांनी पेलत एक हाती सत्ता मिळवली आहे. वार्ड क्र १ मध्ये काकासाहेब वाळुंजकर विरोधात प्रदीप दळवी यांची काटेकी टक्कर झाली यामध्ये प्रदीप दळवी यांचा ११ मतांनी विजयी झाले आहेत. वार्ड क्र १ मध्येच नंदा कल्याण आव्हाड या २ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे चुरशीच्या लढाई या वार्डात पाहायला मिळाली तर पांडुरंग शिंदे हे ४८ मतांनी विजयी झाले आहेत.

प्रभाग २ मध्ये जवळा ग्रामविकास पनलचे तीन हि उमेदवार विजयी झाले आहेत महारनवर भाऊसाहेब कांतीलाल हे ११६ मतांनी विजयी झाले आहेत. आव्हाड मंगल शहाजी १०३ मतांनी विजयी झाले आहेत. तर वाळूंजकर सोनाली राहुल ११७ मतांनी विजयी झाले आहेत.

वार्ड क्र ३ मध्ये शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या तीन हि जागा निवडून आले आहेत. यामध्ये सरोदे किसन दत्तात्रय ७२ मतांनी विजयी झाले आहेत तर प्रशांत पवार हे २९ मतांनी निवडून आले आहे. पठाडे सीताबाई या १८९ मतांनी निवडून आले आहेत

वार्ड क्र ४ मध्ये हरिदास हजारे यांनी ज्योती क्रांतीचे उपाध्यक्ष हजारे दशरथ यांचा ६७ मतांनी पराभव करण्यात आला आहे. तसेच पूजा उमेश रोडे व सारिका सुभास रोडे यांच्या देखील काटे कि टक्कर झाली असून या लढतीत सारिका सुभाष रोडे यांनी १ मतांनी बाजी मारत पूजा रोडे यांचा पराभव केला. तसेच तिसरी लढत जावा जावात झाली या लढती मध्ये माजी उपसरपंच गौतम कोल्हे यांच्या पत्नीचा ७२ मतांनी पराभव केला या वार्डातील तीनही लढती रंगतदार झाल्या असून संपूर्ण निवडणूक या वार्डा भोवती फिरत होती या ४ वार्दावर जवळा ग्रामविकास पनल च्या तीनही जागावर विजय झाला आहे.

वार्ड क्र ५ मध्ये जवळा ग्रामविकास पनाल चे तीन हि उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेले नय्युम शेख यांचा रफिक जमाल शेख यांनी २५१ मतांनी पराभव केला. तसेच प्रशांत शिंदे यांच्या पत्नी शीतल प्रशांत शिंदे यांनी ३४२ मतांनी पराभव केला. तर हजारे राधिका १७७ मते मिळवत विजय मिळविला आहे त्यामुळे जवळा मतदारांनी पुन्हा युवकांच्या हाती सत्ता दिली आहे.

 

वार्ड क्र ४ मध्ये चुरशीच्या लढतीत ज्योती क्रांतीचे उपाध्यक्ष यांचा पराभव

वार्डा मध्ये ४ मध्ये हरिदास हजारे यांनी ज्योती क्रांतीचे उपाध्यक्ष दशरथ हजारे यांचा पराभवाला सामोरे जावे लागले तर वार्डा १ मध्ये विद्यमान उपसरपंच काकासाहेब वाळूंजकर यांचा ११ मतांनी पराभव सामोरे जावे लागले आहेत तर दोन वेळा सदस्य असलेले उमेश रोडे यांना १ मताने पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे चुरशी लढती या ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळाल्या आहेत.

 

 अभियंता यांची ही महत्वाची भूमिका

जवळा ग्रामविकास पॅनल चे प्रमुख हे स्वफ्टवेअर इंजिनियर असलेले प्रशांत शिंदे यांच्या जोडीला अभियंता असलेले प्रवीण मेहेर यांची देखील महत्वाची भूमिका पार पाडली तसेच युवा उद्योजक अमोल रोडे, तसेंच महादेव हजारे यासह आदींची महत्वाची भूमिका राहिली होती

 

झालेले मतदान

जवळा ८५.४१ टक्के मतदान

मतेवाडी ८९ .२१ टक्के मतदान

मुंजेवाडी ९०.६४ टक्के मतदान

रपंच सुशील आव्हाड