साकळाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण तातडीने करावे 

नगर  – नगर व श्रीगोंदा साठी वरदान ठरु शकणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेबाबत सर्वेक्षण करण्यास शासनाने मंजूरी दिली असून त्याबाबतची कारवाई तातडीने करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खासदार डॉ.सुजय विखे यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्याकडे आज मुंबई येथे मंत्रालयात भेट घेवून केले. त्यावेळी त्यांच्या सोबत आमदार निलेश लंके, आमदार आशुतोष काळे उपस्थित होते.

साकळाई उपसा योजनेसाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याबाबतचा निर्णय शासनाकडे प्रलंबित आहे. तत्कालीन युती सरकारच्या काळात कृष्णा पाणी तंटा लवादानुसार कुकडी खोऱ्यामध्ये अतिरीक्त 3 टिमीसी पाणी साकळाई योजनेसाठी वापर करता येईल व विसापूर धरणात पाणी आणून योजना कार्यन्यावित करण्याचे ठरले होते. साकळाई उपसा योजना मार्गी लागल्यास श्रीगोंदा आणि नगर मधील 35 गावातील जनतेचा 23 वर्षापासून रखडलेला प्रश्न मार्गी लागेल असे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले.

तसेच ह्या 35 गावातील जनतेची मागणी पाण्याची नसून पाझर तलाव, बंधारे आणि लघू पाट बंधारे वर्षातून एखदा भरुन द्यावेत एवढीच रास्त अपेक्षा असल्याचे खा.डॉ.विखे यांनी सांगितले. साकळाई उपसा जलसिंचन योजना ही अनेक वर्ष प्रलंबित आहे. अनेकवेळा त्यासाठी मोठी आंदोलने झाली आहेत. त्यामुळे ह्या योजनेचे तातडीने सर्वेक्षण पूर्ण करणे, व त्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे अशी मागणी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे केली. याबाबत जलसंपदा महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देवून लावकरच याबाबत अधिकरीच्या बैठक घेवून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे खा.डॉ.विखे यांनी सांगितले.

Leave a Comment