तालीबानने बंद केली मुलींची शाळा

काबूल – अफगामिस्तानातील पक्तिया येथील मुलींची शाळा सुरू करून लगेच बंद करण्यात आल्यामुळे तालिबानवर जगभरातून मोठी टीका व्हायला लागली आहे. पक्तियातील मुलींच्या शाळा बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ शेकडो मुलींनी पक्तीया शहराच्या मध्यवस्तीत जोरदार निदर्शने केली.

निदर्शने करणाऱ्या या मुलींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे अफगाणिस्तानातील तसेच जगभरातील राजकीय नेते, समाज सुधारक आणि सामाजिक हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उमटली.

आदिवासींच्या ज्येष्ठ नेते आणि स्थानिकक शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पक्तिया शहरातील इयत्ता 6 वी पुढच्या मुलींसाठीच्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र या शाला लगेचच पुन्हा बंद करण्यात आल्या. त्याबद्दल सर्वच स्तरांमधून निषेध व्यक्त होतो आहे.

पश्‍तुन तहफूज मुव्हमेंट, अफगाण नॅशनल ऑलिम्पिक कमिटी, “ह्युमन राईट वॉच’ संघटनेच्या महिला हक्क विभागाने आणि महिलांच्या हक्कांविषयी काम करणाऱ्या अन्य संघटनां, शिक्षण विषयकक कार्यकर्त्यांनी एका खुल्या पत्राद्वारे तालिबानच्या महिलाविषयक धोरणाचा तीव्र निषेध केला आहे. मुलींच्या साळा पुन्हा सुरू करण्यासाठी तालिबानवर दबाव आणावा असे आवाहन या संघटनांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे.