पिंपरी | चेडोबा मैदानावर रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार

कर्जत,  (वार्ताहर) – कर्जत तालुक्यातील शेळू येथील चेडोबा मैदानावर येत्या शुक्रवारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या नमो चषकच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीचा थरार नागरिकांना अनुभवाला मिळणार आहे, अशी माहिती कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी दिली.

नमो चषकच्या माध्यमातून पळसदरी येथे आदिवासी बांधवांसाठी कब्बडी स्पर्धेचे तर खालापूरमध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता शुक्रवारी शेळू येथील चेडोबा मैदानावर बैलगाडा शर्यतीचा थरार नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, आमदार महेश लांडगे, आमदार किसन कथोरे, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे ज्येष्ठ नेते नरेश पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संदीप माळी उपस्थित रहाणार आहेत.