कुस्ती निवड चाचणी आज होणार

पुणे  – गुलशाची तालिम येथे कुस्तीपटूंसाठी निवड चाचणी आज होणार आहे. या चाचणीतून निवडण्यात आलेल्या कुस्तीपटूंना तालमित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात 20 मुले व मुली यांची चाचणी होणार आहे.

ही निवड चाचणी 17 वर्षांखालील खेळाडूंसाठी आहे. निवडण्यात आलेल्या कुस्तीपटूंना भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून दरमहा 1 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असून 2 ट्रॅकसुट, 2 कॉश्‍च्युम व 2 कुस्ती बुट देण्यात येणार आहेत.

तसेच प्राधिकरणातर्फे प्रशिक्षकांचीही नियुक्ती केली जाणार आहे.या खेळाडूंची निवास व्यवस्थाही तालमीकडून होणार आहे, अशी माहिती तालमिचे सचिव भुषण विजयराव जाधव यांनी दिली आहे.

Leave a Comment