साखर उद्योगासाठी ठोस तरतूद नाही- राजू शेट्टी

कोल्हापूर :अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेट वरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बजेटमध्ये नव असं काहीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच साखर उद्योगास संदर्भात देखील कोणतीच ठोस तरतूदी चा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या बाबींवर  घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी कृषी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामीण भाग आदी क्षेत्रांना चालना देण्याच्या दृष्टीने भरीव तरतूद केली आहे. अडीच तासांपेक्षा अधिक कालावधी हा अर्थसंकल्पाचे वाचन करण्यासाठी लागला. या अर्थसंकल्पामध्ये आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बजेटमध्ये नव असं काहीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच साखर उद्योगास संदर्भात देखील कोणतीच ठोस तरतूदीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. वेगवेगळ्या बाबींवर घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव दिलं असं सांगितलं जातंय. मात्र शेतकऱ्यांसाठी हा फक्त बुडबुडा आहे. फक्त योजना आखून शेती सुधारत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्या वाढत आहे, पायाभुत सुविधांचा अभाव आहे, नवीन तंत्रज्ञान मिळत नाही, नवीन संशोधनाकडे सरकारचं दुर्लक्ष झालं आहे. या गोष्टींकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. एकाबाजूला शेतीसाठी भरीव तरतूद केल्याचा त्यांनी फक्त गाजावाजा केला आहे. प्रत्यक्षात कृषीक्षेत्रासाठी 1 लाख 60 हजार कोटीची तर 1 लाख 23 हजार कोटी हे जलसंधारण ग्रामीण विकासासाठी केली. मात्र देशाचे आकारमान बघता आणि शेती क्षेत्राची झालेली फरपट बघता. ही तरतूद खूप तुटपुंजी आहे अशा शब्दात राजू शेट्टींनी टीका केली आहे.

 

Leave a Comment