“भाजपविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे” बावनकुळेंच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणतात,”राजकीय नेते..”

मुंबई – 2024 च्या निवडणुकीआधी पत्रकारांनी आपल्याविरोधात एकही बातमी छापू नयेय यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा.. ढाब्यावर जेवायला न्या, अशा सूचना करतानाची भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.बावनकुळेंच्या या क्लिपची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीसांनी बावनकुळेंची पाठराखण पाठराखण केली आहे. (chandrashekhar bawankule viral clip)

अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन केलं. यावेळेसची बावनकुळेंची एक क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.

बावनकुळे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये. बावनकुळे व्यंगात्मक बोलले आहेत. त्यामुळे त्यावरून वाद निर्माण करणं, अतिशय चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधत फडणवीसांनी याबाबत भाष्य केलं.मला वाटतंय की, बावनकुळे काय म्हणतायत आणि त्याचा काय अर्थ निघतो, या दोन्ही गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. त्यामुळे तसा अर्थ काढण्याचं काहीही कारण नाही असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. (bawankule on patrakar)

फडणवीस पुढे म्हणाले,”राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांबरोबर असताना अनेकदा काही गोष्टी व्यंगात्मक बोलतात, त्या गोष्टी त्याच अर्थाने घ्यायच्या नसतात. बावनकुळेंच्या मनात कुठेही अशाप्रकारचा हेतू नाही. त्यामुळे त्यावर वाद निर्माण करणं अतिशय चुकीचं आहे”

काय म्हणाले होते बावनकुळे नेमकं
“आपण इतकं चांगलं काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहाला बोलवा. चहा प्यायला बोलावणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचं. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे” असं बावनकुळे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटल्याचे समजते.