‘ही’ आहेत पृथ्वीवरील सर्वात रहस्यमय ठिकाणं!

न्यूयॉर्क : पृथ्वीवर अनेक रहस्ये दडलेली आहेत, जी आजपर्यंत उलगडलेली नाहीत. या गुपितांबद्दल जाणून घेतल्यावर विश्वास ठेवू शकत नाही. शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे पृथ्वीची ही रहस्ये सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. जगाच्या या रहस्यांमागे काय कारण आहे? ते आजतागायत माहीत नाही. आज आम्ही जगातील काही रहस्यमय ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल…

1. इलाहा दा क्विमाडा बेट

ब्राझीलमध्ये असलेल्या या बेटावर फक्त साप आहेत. येथे दर तीन फुटांवर किमान चार-पाच साप पाहायला मिळतील. आजपर्यंत त्याच्या गुपिताबद्दल कोणालाच माहिती मिळालेली नाही. या बेटाला सापांचे बेट म्हणतात. गोल्डन लान्सहेड व्हायपरसारखे विषारी साप येथे राहतात. ब्राझीलच्या नौदलाने या बेटावर लोकांच्या येण्यावर बंदी घातली आहे.

2. इथिओपियाचे डनाकिल वाळवंट
इथिओपियाच्या या बेटावर हवामान खूप लवकर बदलते. इथे कधी उष्ण, कधी थंड वातावरण राहते. डनाकिल वाळवंटात वर्षभर तापमान 48 डिग्री सेल्सियस असते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वेळा येथील तापमान 145 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. उष्णतेमुळे या भागाला पृथ्वीवरील सर्वात क्रूर ठिकाण असेही म्हटले जाते. ते इतके उष्ण आहे की येथील तलावांचे पाणी उकळत राहते. डनाकिल वाळवंटाने 62,000 मैलांपेक्षा जास्त क्षेत्र व्यापले आहे. इथल्या उष्णतेला नरकाची आग असेही म्हणतात.

3. चोलुलाचा ग्रेट पिरॅमिड
मेक्सिकोमध्ये स्थित चोलुलाचा ग्रेट पिरॅमिड अजूनही एक रहस्य आहे. तो कोणी बांधला आणि त्याच्या बांधणीमागील कारण काय, याचा शोध आजपर्यंत कोणालाही लागला नाही. मंदिरासारखा दिसणारा पिरॅमिडचा इतिहास माहीतच नाही. जगातील सर्वात मोठ्या पिरॅमिड्समध्ये त्याचा समावेश होतो.

4. बर्म्युडा ट्रँगल
बर्म्युडा ट्रँगल हे जगातील सर्वात धोकादायक आणि रहस्यमय ठिकाण मानले जाते. बर्म्युडा ट्रँगलमध्ये अनेक विमानं बेपत्ता झाली आहेत, ज्यांचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. तीन ठिकाणांच्या मधोमध असल्याने या ठिकाणाला बर्म्युडा ट्रँगल म्हणतात. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण जास्त आहे, त्यामुळे येथून जाणारी कोणतीही वस्तू त्यात शोषली जाते.

5. डेथ व्हॅली
अमेरिकेतील डेथ व्हॅली ही उष्णतेसाठी जगभरात ओळखली जाते. या ठिकाणी काही वेळा तापमान 130 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. 1913 मध्ये येथे 134.06 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. डेथ व्हॅलीमध्ये सरासरीच्या केवळ 5% पाऊस पडतो. हे जगातील सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये समाविष्ट आहे आणि येथे पाण्याचा मागमूसही नाही.