कर्नाटकात तेरा नवे मंत्री शपथ घेणार

बंगलुरू : कर्नाटकातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यावेळी तेरा नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज दिली.

या तेरा नव्या मंत्र्यांमध्ये अन्य पक्षातून भाजप मध्ये दाखल झालेल्या दहा आमदारांचा समावेश असणार आहे. हे आमदार जेडीएस आणि कॉंग्रेस पक्षातून भाजप मध्ये आले आहेत. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हिरवा झेंडा दाखवला आहे.

कर्नाटकात गेले सहा महिने येडियुरप्पा सरकार सत्तेवर आले आहे. त्यानंतर पक्षांतर करणाऱ्या पंधरा आमदारांच्या जागांवर 5 डिसेंबरला पोटनिवडणूक झाली आहे आणि त्यातील 12 जागा भाजपने जिंकल्या आहेत. कर्नाटकातील मंत्रिमंडळात 34 मंत्र्यांना घेण्याची अनुमती असून सध्या मुख्यमंत्र्यांसह 18 मंत्री कार्यरत आहेत.

 

Leave a Comment