“या वेळीही ज्योतिरादित्य गुणा मधून पराभूत होतील..” बड्या नेत्याने वर्तवले भाकीत

Jayram ramesh on Jyotiraditya Shinde : ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने यंदा गुणा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे, पण ते गेल्या निवडणूकीप्रमाणे याही निवडणूकीत पराभूत हेातील असे भाकित काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले आहे. गुना जिल्ह्यात एका वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेत्याने ही टिप्पणी केली.

काँग्रेसचा उमेदवार गुना मतदारसंघातून शिंदे यांना पराभूत करू शकेल का, असे विचारले असता रमेश म्हणाले, “ज्योतिरादित्य शिंदे ज्या प्रकारे २०१९ मध्ये निवडणूक हरले, तसेच २०२४ मध्येही त्यांचा पराभव होईल.२०२० मध्ये सिंधिया यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. | Jayram ramesh on Jyotiraditya Shinde

दरम्यान, पाटण्यात झालेल्या राजदच्या जनविश्वास महा रॅलीबाबत बोलताना जयराम रमेश म्हणाले की, ही एक महत्त्वाची रॅली होती. पाटणा हे राजकारणाचे केंद्र आहे आणि तेथून राजकीय भूकंप सुरू होतात. | Jayram ramesh on Jyotiraditya Shinde

इंडिया आघाडीचे प्रमुख चेहरे तिथे होते आणि त्यात एकच संदेश होता की इंडिया आघाडी म्हणजे शेतकरी आणि तरुणांना न्याय, बेरोजगारीपासून मुक्ती, आर्थिक विषमतेपासून आणि सामाजिक ध्रुवीकरणापासून स्वातंत्र्य. ही एक महत्त्वाची रॅली होती. पाटणा हे राजकारणाचे केंद्र आहे. ‘राजनीतिक भूकंप सब पटना से ही शुरू होते है असे ते म्हणाले. | Jayram ramesh on Jyotiraditya Shinde