nagar | वारकरी संप्रदायातून सुख, समृद्धीचे विचार

पारनेर, (प्रतिनिधी)- वारकरी संप्रदाय सर्व मानव जातीच्या सर्वांगीण कल्याणासाठी तसेच सुख समाधान प्राप्त करण्याचे विचार शिकविणारा असल्याचे प्रतिपादन हभप बाळकृष्ण महाराज कांबळे यांनी सोबलेवाडी येथे आयोजित अखंड त्रिदिणीनाम जप व हनुमान जन्म उत्सव सोहळा प्रसंगी केले.

या काल्याच्या सोहळ्याप्रसंगी हभप दगडू महाराज शेळके, हभप देवराम धोंडीभाऊ शेरकर, मृदंगसम्राट आदिनाथ महाराज गलधर, हभप कैलास महाराज शिंदे, गायनाचार्य रामेश्वर महाराज मस्के, शिवाजी महाराज माने, प्रभू महाराज लांडे, साहेबराव महाराज सोबले आदी उपस्थित होते.

संतदास वारकरी शिक्षण संस्था पैठण व गायनाचार्य रामेश्वर महाराज म्हस्के व सुररत्न शिवाजी महाराज माने यांनी शिवाजी महाराज यांचा पोवाडा गात काल्याच्या कीर्तनाची सांगता झाली. संयोजकांच्या वतीने भाविकांनी मंदिर देवस्थान जीर्णोद्धार कामी देणगी देण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले.