nagar | अपह्रत तीन मुलींची ९ दिवासानंतर सुटका

नगर (प्रतिनिधी) – शेवगाव तालुक्यातील अपहरण झालेल्या तीन मुलींची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला ९ दिवसानंतर यश आले आहे. गुन्हे शाखेने एका आरोपीस ताब्यात घेतले त्याला शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखीच्या दोन्ही पथकांनी पुणे, मुंबई, धाराशिव, बीड, जालना, परभणी, छ. संभाजीनगर, पिंपरी चिंचवड या जिल्ह्यामध्ये जावुन आरोपीचे मित्र, नातेवाईक यांचा शोध घेताला. तसेच वेगवेगळ्या २०० ते ३०० ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरेचे फुटेज तपासण्यात आले.

पोपट उर्फ पोपट्या शहादेव बोरुडे (वय २०) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी पोपट बोरूडे याने (दि. १९) एप्रिल रोजी शेवगाव तालुक्यातील तीन मुलींना कशाचे तरी अमिष दाखवून पळवून नेले होते. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना या गुन्ह्याचा उलगाडा करून मुलींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तत्काळ दोन पथके तयार करून मुलींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. पथकाने गुन्हा घडल्यापासुन शेवगाव शहरातील व शेवगाव ते नगर जाणार्या रस्त्यावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे फुटेज तपासले. यात आरोपी हा तीन मुलींना दुचाकीवर घेवुन जातांना शेवगाव ते नगरकडे जाणारे रोडवरील मराठवाडी पर्यंत दिसुन आला.

मात्र त्यानंतर दिसून आले नाही. रविवार (दि.२८) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना एका महिलेने फोनवरून तीन मुली व एक मुलगा सुपा परिसरात असल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने तत्काळ जावून मिळालेल्या माहितीनुसार तीन मुली व एक मुलास ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, भरत बुधवंत, विजय धनेधर, महिला पोलीस अंमलदार छाया माळी यांच्या पथकाने केली.