सिनेसृष्टीतील तेजस्वी “चांदणी…’, श्रीदेवी यांचा आज स्मृतिदिन

पुणे – सौंदर्य, अभिनय आणि नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या दिवंगत अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचा आज स्मृतिदिन. श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. श्रीदेवी यांचेखरे नाव श्रीअम्मा यंगर अय्यप्पन असं आहे.

अभिनेत्री श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली.

यात तिने मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवी यांची झलक दिसली होती. पण ती या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हती. पुढे ९० च्या दशकात मात्र तिने हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवली.

सोलवा सावन या चित्रपटातून श्रीदेवीने १९७८-७९ च्या दरम्यान हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर १९९७ पर्यंत पुढची १८-१९ वर्षे ती हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत राहिली. श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ,तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

श्रीदेवी यांनी आजपर्यंत ‘जैसे को तैसा’, ‘जूली’, ‘सोलहवां साल’, ‘हिम्मतवाला’, ‘जस्टिस चौधरी’, ‘जानी दोस्त’, ‘कलाकार’, ‘सदमा’, ‘अक्लमंद’, ‘इन्कलाब’, ‘जाग उठा इंसान’, ‘नया कदम’, ‘मकसद’, ‘तोहफा’, ‘बलिदान’, ‘मास्टर जी’, ‘सरफरोश’,’आखिरी रास्ता’, ‘जवाब हम देंगे’, ‘मिस्टर इंडिया’, ‘शेरनी’, ‘सोने पे सुहागा’, ‘चांदनी’, ‘गुरु’, ‘निगाहें’, ‘बंजारन’, ‘फरिश्ते’, ‘पत्थर के इंसान’, ‘लम्हे’, ‘खुदा गवाह’, ‘हीर रांझा’, ‘चंद्रमुखी’, ‘गुमराह’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘चांद का टुकड़ा’, ‘लाडला’, ‘आर्मी’, ‘मि. बेचारा’, ‘कौन सच्चा कौन झूठा’, ‘जुदाई’, ‘मिस्टर इंडिया २’ यासारख्या चित्रपटातून भूमिका केल्या होत्या.

निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ‘जुदाई’ चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. २०१२ साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना २०१३ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

सिनेमांमधून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवी यांचा मृत्यू  २४ फेब्रुवारीला दुबईमधील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. त्यानंतऱ्‌ “मॉम’ या श्रीदेवीच्या अखेरच्या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला.

Leave a Comment