फळभाज्यांना पावसाचा तडाखा; असे आहेत आजचे ‘दर’

पुणे- जिल्ह्यासह विभागात सुरू असलेल्या पाऊसामुळे मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने आले, टोमॅटो, फ्लॉवर, कोबीच्या भावात दहा ते वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्याने कारली, दोडका, काकडी, सिमला मिरची आणि घेवड्याची भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

रविवारी मार्केटयार्डात 80 ते 90 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये मध्यप्रदेश येथून येथून 6 टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून 5 ते 6 टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून 7 ते 8 ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि गुजरात येथून बटाट्याची 30 ते 35 ट्रक इतकी आवक
झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 700 ते 800 गोणी, कोबी सुमारे 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 7 ते 8 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, टोमॅटो 6 ते 7 हजार पेटी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, पावटा 4 ते 5 टेम्पो, पुरंदर, पारनेर भागातून मटार 1 हजार ते 1200 गोणी, भुईमुग शेंग 150 पोती, कांदा 50 ट्रक इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : 150-200, बटाटा : 100-150, लसून : 300-1000, आले : सातारी 150-250, भेंडी : 150-200, गवार : 200-300, टोमॅटो : 100-150, दोडका : 100-200, हिरवी मिरची : 200-350, दुधी भोपळा: 100-120, चवळी : 150- 200, काकडी : 80-100, कारली हिरवी 150- 200, पांढरी 100-150, पापडी : 100-150, पडवळ : 150-160, फ्लॉवर : 100-140, कोबी : 100-140, वांगी : 100-200, डिंगरी : 150-200, नवलकोल: 100-120, ढोबळी मिरची: 100-200, तोंडली: कळी 200-250, जाड : 100-120, शेवगा : 200-300, गाजर 200-250, वालवर 200-300, बीट: 60-80, घेवडा : 350-400, कोहळा : 100-120, आर्वी: 200- 250, घोसावळे : 200-250, ढेमसे : 200-250, भुईमूग शेंग : 300-350, मटार: स्थानिक: 450-500, पावटा: 200-250, तांबडा भोपळा : 60-100, सुरण: 160-180, नारळ: शेकडा 1000- 1600, मका कणीस : 60-100.