आजचे भविष्य ( शनिवार, ७ ऑगस्ट २०२१)

मेष :प्रियजनांचा सहवास लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. कार्यतत्पर राहाल. इच्छा सफल होतील.

वृषभ : प्रवासात काळजी घ्या. सार्वजनिक कामात पुढाकार राहील. सहकारी मदत करतील. नेतृत्व कराल.

मिथुन : मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल. दूरदृष्टी ठेवाल. प्रवासयोग संभवतो. आप्तेष्ट भेटतील.

कर्क : प्रवासाचे बेत पुढे ढकला. मनःस्ताप होईल. अपेक्षित साथ मिळेल. ओळखीतून कामे मिळतील.

सिंह : दैनंदिन कामे पूर्ण होतील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. अपेक्षा पूर्ण होतील. प्रगती कराल. चिकाटी वाढेल.

कन्या : आध्यात्मिक प्रगती होईल. मनःशांती मिळेल. अपत्यप्राप्ती होईल. अपेक्षा वाढतील.

तूळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील. जोडधंद्यातून लाभ कष्टाचे चीज होईल.

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल. पाहुणे येतील. आनंददायक दिवस.

धनू : जिद्द वाढेल. अडचणींवर मात कराल. हितसंबंध जपाल.ध्येय पूर्ण होईल. नवीन प्राप्ती होईल. सुसंधी मिळेल.

मकर : महत्त्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल. कार्यमग्न राहाल. कामे पूर्ण होतील. मनोरंजन कराल.

कुंभ : कामात अडचणी येतील. घाईने कृती टाळा. छंद जोपासाल. आवडत्या व्यक्‍तीची भेट.

मीन : सहकारी मदत करतील. हितशत्रूंवर मात कराल. दगदगीचा दिवस. उत्साह कमी होईल.