तुषार कपूर OTT प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण; ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Tusshar Kapoor|  बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘गोलमाल’ या चित्रपटामुळे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. यातील त्याने विनोदी भूमिका उत्तमरित्या निभावली होती. बॉलीवूड चित्रपटानंतर आता तुषार कपूर देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ओटीटीद्वारे तो  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणा अरोराच्या ‘डंक – वन्स बिटन ट्वीस शाय’ या चित्रपटामध्ये तो पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटामध्ये तुषार कपूर अजिंक्य नावाचे पात्र साकारणार असून तो वकिलाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा तुषार भेटीस येणार असल्याने चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटामध्ये तुषार कपूर व्यतिरिक्त  दिव्या खोसला कुमार, निधी अग्रवाल, शिविन नारंग, सुचित्रा कृष्णमूर्ती हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. डंक चित्रपटाबद्दल प्रेरणा अरोराने  तकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा हा चित्रपट ठरणार असल्याचे सांगितले आहे.

प्रेरणाने ‘रुस्तम’, ‘टॉयलेट – एक प्रेम कथा’, राष्ट्रीय विजेते ‘पॅड मॅन’, ‘परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण’ यासारखे यशस्वी चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे. ‘डंक’ व्यतिरिक्त प्रेरणा अरोरा तेलुगू चित्रपट ‘हीरो हिरोइन’ची निर्मिती करत आहे.

दरम्यान, तुषार कपूरने ‘गोलमाल 2’, ‘खाकी’ आणि ‘शूट आऊट एट वडाला’ या चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. यानंतर आता तो OTT प्लॅटफॉर्मवर डंक चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

हेही वाचा: 

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ‘या’ सात उमेदवारांची नावं ‘फिक्स’; दोन महिला उमेदवारांनाही मिळणार संधी