Jammu and Kashmir : दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगचे सत्र चालूच; काश्‍मीरमधील ग्रेनेड हल्ल्यात…

श्रीनगर– दक्षिण काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन परप्रांतीय मजूर मृत्युमुखी पडले. (Two labourers from U.P. killed in grenade attack in J&K) मृत मजूर उत्तरप्रदेशचे रहिवासी होते. ताज्या घटनेतून दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंगचे सत्र चालूच ठेवल्याचे सूचित झाले.

शोपियॉंमध्ये एका पत्र्याच्या शेडला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी सोमवारची मध्यरात्र उलटल्यानंतर ग्रेनेड डागला. त्या ग्रेनेडच्या स्फोटात मोनीश कुमार आणि राम सागर हे मजूर गंभीर जखमी झाले. दोघे झोपेत असताना तो हल्ला झाला. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी मजुरांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. पण, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. ग्रेनेड हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यातील लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असणाऱ्या दहशतवाद्याने ग्रेनेड हल्ल्यात सामील असल्याची कबुली दिली.

Gujarat Assembly elections 2022 : गुजरातमध्ये भाजपची लढाई ‘आप’शीच? जनमत चाचण्यांमध्ये…

मागील काही महिन्यांपासून दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंगचे सत्र आरंभले आहे. ते दहशत निर्माण करण्यासाठी काश्‍मिरी पंडित आणि परप्रांतीयांना लक्ष्य करत आहेत. याआधी दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी शोपियॉं जिल्ह्यातच एका काश्‍मिरी पंडिताची गोळ्या घालून हत्या केली होती.