”लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दोन दिवसांपासून दिल्लीत, पण …”

Udayanraje Bhosale । लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना, सातारा मतदारसंघातील उमेदवारीबाबत भाजपने अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीचे सदस्य व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची जलमंदिर या निवासस्थानी सोमवारी अचानक भेट घेतली होती

या दोघांमध्ये सुमारे 40 मिनिटे कमराबंद चर्चा झाली. उदयनराजे यांची नाराजी दूर करण्यासाठी महाजन यांनी शिष्टाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अशात सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी खासदार उदयनराजे भोसले मागील दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. मात्र अजूनही त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भेट शुक्रवारी सायंकाळ पर्यंत झालेली नाही. यावरून उदयनराजे यांना अमित शाह यांची भेट मिळत नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आता सातारा लोकसभेचे संयोजक सुनील काटकर यांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली आहे.

सातारा लोकसभेचे संयोजक सुनील काटकर म्हणाले,’उदयनराजे यांना अमित शाह यांची भेट मिळत नाही, या केवळ अफवा आहेत. आम्हाला मुंबईत ज्यांना भेटायचं होतं त्यांना आम्ही भेटलेलो आहोत. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या २० मतदारसंघांची यादी जाहीर झालेली आहे. ते पुढे म्हणाले, अजून २८ मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे उरलेल्या २८ जागा या पुढील एक-दोन दिवसांत जाहीर होतील. महायुतीमध्ये तीन घटक पक्ष असल्याने उमेदवारी जाहीर होईपर्यंत वेगवगेळ्या गोष्टी घडणार आहेत. अजून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.’ असेही काटकर म्हणाले आहे.

हे वाचले का ? मित्र पक्ष गमावला…! ‘या’ राज्यात भाजपच्या लहान भावाची भूमिका मित्र पक्षाला ‘अमान्य’