Israel ‘blacklisted’ : संयुक्त राष्ट्राकडून काळ्या यादीत टाकण्यावर इस्रायलची टीका…

तेल अविव :– संघर्षादरम्यान बालकांची हानी केल्याबद्दल इस्रायलच्या सुरक्षा दलाला काळ्या यादीमध्ये टाकण्याच्या निर्णयाबद्दल इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रावर जोरदार टीकाकेली आहे. संयुक्त राष्ट्राचा हा निर्णय फेटाळण्यात येत असून हा निर्णय लाजिरवाणा असल्याची टीका इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कात्झ यांनी केली आहे.

इस्रायलचे सुरक्षा दल असलेल्या आयडीएफला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय संपूर्णपणे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस यांचाच आहे. इस्रायलचा द्वेष करण्याच्या त्यांच्या मानसिकतेचेच हे आणकीन एक उदाहरण आहे. यापूर्वीही त्यांची मानसिकता दिसून आली आहे.

Russia-Ukraine war : रशियाचे लढाऊ विमान उडवल्याचा युक्रेनचा दावा

हमासने गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलला आत्मसंरक्षणासाठी कारवाई करण्याचा अधिकार नाकारण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. गुटेरेस यांनी वारंवार हमासच्या हल्ल्याकडे आणि लैंगिक अत्याचारांकडे दुर्लक्षच केले होते. संयुक्त राष्ट्राच्या विशेष प्रतिनिधींनी दिलेल्या अहवालानंतरही त्यांची ही भूमिका कायमच राहिली होती, असे कात्झ यांनी म्हटले आहे.