अनधिकृत उत्खननामुळे ‘संग्रामदुर्ग’च्या तटबंदीला धोका

चाकण – येथील ऐतिहासिक संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या सभोवताली अनधिकृतपणे विनापरवाना उत्खनन करण्यात आले असून यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. किरण झिंजुरके यांनी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालकांकडे तक्रार केली असून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संग्रामदुर्ग किल्ल्याच्या भिंती लगत उत्तर बाजूने पूर्व कोपऱ्यात सिटी सर्व्हे नं. 708 व 709 मध्ये किल्ल्याच्या भिंतीला लागून जेसीबीच्या साहाय्याने उत्खननाचे काम सुरू आहे. त्यामुळे किल्ल्याच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे. हे काम करताना झाडांची मुळासकट उपसून कत्तल करण्यात आली आहे. तरी हे अनधिकृत उत्खनन व झाडांची कत्तल थांबवून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ऍड. झिंजुरके यांनी केली आहे. या पत्राच्या प्रति त्यांनी चाकण पोलीस ठाणे, तहसीलदारांना दिल्या आहेत.

Leave a Comment