केंद्रीय मंत्र्याची बहिण “सपा”ची उमेदवार

कौशंबी – केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या थोरल्या भगिनी पल्लवी पटेल या उत्तर प्रदेशच्या विदानसबेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र यामुळे अनुप्रिया पटेल संतप्त झाल्या आहेत.

त्यांनी आपल्या सख्ख्या बहिणीवर जोरदार टीका केली आहे. आपल्या वडिलांच्या विचारधारेशी कटिबद्ध असतानाही पल्लवी पटेल यांनी समाजवादी पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्‍न अनुप्रिया पटेल यांनी विचारला आहे.

पल्लवी पटेल या सपाच्या तिकीटावर कौशंबीच्या सिराथू मतदारसंघातून निवडणूकीत उभ्या आहेत. उत्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याविरोधात त्या निवडणूकीत उतरल्या आहेत.

अनुप्रिया पटेल या केंद्रात व्यापार आणि वाणिज्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री आहेत. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अपना दल (सोनेलाल) या पक्षाचे प्रतिनिधीत्व त्या करत आहेत. पल्लवी पटेल यांच्या उमेदवारीमुळे मौर्य यांच्यासाठी ही निवडणूक अधिक अवघड बनली आहे.

पल्लवी आणि अनुप्रिया या दोघी सोनेलाल पटेल यांच्या कन्या आहेत. सोनेलाल पटेल यांच्या प्रभावामुळे या दोघींना ओबीसी कुरमी जातीचा मोठा पाठिंबा आहे.