माजी सरपंच गफ्फार पठाण यांच्याकडून अनोखी कार्तिकी पायी दिंडीची सेवा

जामखेड – शहराची नामांतरे, जातीय-धार्मिक तेढ पसरवणाऱ्या अफवांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स, हिंदू आक्रोश मोर्चा, व्हॉट्सअपची स्टेटस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अलीकडच्या काळात हिंसाचाराच्या घटना वाढत चाललेल्या आपण पाहिल्या. मात्र तालुक्यातील पाटोदा ग येथील माजी सरपंच गफ्फार पठाण याला अपवाद ठरले आहे! ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या सानेगुरुजींच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव येतो ते म्हणजे दरवर्षी त्याच्याकडून होणारी आषाढी कार्तिकीवारीतील वारकऱ्यांची सेवा यामुळे खऱ्या अर्थाने हिंदू-मुस्लिम सलोखा पाळला जात आहे हि कौतुकाची बाब आहे
दरवर्षी भवरवाडी ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी ह भ प कांताताई (माईसाहेब) सोनटक्के महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघते.

पायी दिंडी पाटोदा ग येथे आल्यावर गावाचे माजी सरपंच गफ्फार पठाण यांच्याकडून स्वागत करण्यात आले यावेळी पठाण कुटूंबीयांकडून वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता पाण्याची सोया करण्यात आली होती यावेळी खडकत चे माजी सरपंच रामदास उदमले, कल्याण कवादे पाटील, संदीप कडू, नवनाथ माने, विष्णू भवर, मनोहर निर्मळ, आसिफ भाई तांबोळी, आदी ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“गेल्या अनेक वर्षांपासून गफ्फार पठाण या मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांची सेवा केली जाते. गावात धार्मिक सलोख्याचे वातावरण राहावे, हिंदू-मुस्लिम एकोपा टिकून राहावा हा संदेश देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. वारकऱ्यांची सेवा करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.”गावातील सप्ताह सोहळा,ईदमिलाद,यात्रा,लग्नकार्य यात प्रत्येकाचे योगदान घरच्या कार्यापेक्षा कमी नसते.

यावेळी बोलताना गफ्फार पठाण म्हणले कि ,वारकरी म्हणजे कुठल्या एका धर्माची किंवा पंथाचे आहेत असं नाही. वारकऱ्यांमध्ये शेख मोहम्मदसारखे संत होऊन गेले आहेत. सेवा ही श्रेष्ठ आहे, प्रत्येकाच्या अंतरात्म्यात पांडुरंग-अल्लाह आहे.त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही दरवर्षी उत्साहाने तयारीला लागत असतो. यामध्ये आम्हाला आनंद मिळतो, असं सांगतात.