#UP Election 2022 : अयोध्येत आला नव्या रंगाचा फलक

नवी दिल्ली-उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच अयोध्याचे जिल्हाधिकारी नितीशकुमार यांनी भगवा फलक काढून हिरव्या रंगाचा फलक लावल्याने सत्ताबदलाची चर्चा होवू लागली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले असून दोन टप्प्याचे मतदान बाकी आहे. 3 मार्च रोजी सहाव्या तर 7 मार्च रोजी सातव्या टप्प्यासाठी मतदान केले जाईल. यानंतर 10 मार्च रोजी निकाल येणे आहे.

अशातच, अयोध्याचे जिल्हाधिकारी नितीशकुमार यांनी सरकारी निवासाबाहेरचा फलक बदलला आहे. आधी ‘जिल्हाधिकारी निवास’ भगव्या रंगाच्या फलकावर लिहिले होते. या ठिकाणी आता हिरव्या रंगाच्या फलकावर ‘जिल्हाधिकारी निवास’ लिहिलेला बोर्ड लावला आहे. या बोर्डचा फोटो खूप व्हायरल होत आहे. यामुळे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार जाण्याचे तर हे संकेत नाही ना? असा प्रश्‍न राज्यात सर्वत्र विचारला जावू लागला आहे.