#UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा

लखनौ -उत्तर प्रदेशच्या विधान सभांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच आता उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाने रविवारी या निवडणुकांची घोषणा केली.

एकूण 35 स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेचे 36 सदस्य निवडले जाणार आहेत. विद्यमान सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत 7 मार्च रोजी संपत आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्‍ला यांनी सांगितले.

मथुरा-इटाह-मैनपुरी या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी 2 सदस्य निवडले जाणार आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 20 आणि दुसऱ्या टप्प्यात 6 सदस्यांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 7 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी 12 मार्च रोजी होणार आहे.